टोलनाका कृती समितीच्या अध्यक्षपदी संतोष रेहरे यांची निवड...

टोलनाका कृती समितीच्या अध्यक्षपदी संतोष रेहरे यांची निवड...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

नाशिक - पेठ महामार्गावरील चाचडगाव टोलनाका विरोधी दिंडोरी तालुका कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यात अध्यक्षपदी अंबानेरचे माजी सरपंच संतोष रहेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नाशिक - पेठ महामार्गावरील चाचडगाव येथील टोलनाक्यावर नेहमीच शेतकर्‍यांना अरेरावीची भाषा करुन दमदाटी करीत असतात. त्याचप्रमाणे शेतकरी टोल भरुन सुध्दा अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची अरेरावी करीत असतात. काही कारण नसतांनाही विनाकारण शेतकर्‍यांना त्रास देण्याचे काम करीत आहे. या टोलनाक्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. या टोलनाका विरोधात परिसरातील गावे एकत्र येवून कृती समिती स्थापन करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी संतोष रहेरे, उपाध्यक्षपदी दत्तू मोरे, कार्याध्यक्ष वसंत भोई, जीवन मोरे संतोष लोखंडे, नाना मोरे, संतोष लोखंडे, हेमराज बोंबले, संजय सोनवणे, सुरेश वाघ, गोरख पगारे, वसंत भोये, अशोक शेखरे, कांतीलाल राऊत, दत्तू मोरे, राजेंद्र बोंबले, दिलीप बोंबले, संदीप पताडे, हिरामण झनकर, हिरामण जाधव, वसंत गांगोडे, ज्ञानेश्वर पेलमहाले आदींची निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया... 

चाचडगाव टोलनाक्याच्या तक्रारी वाढत असल्याने; त्यामुळे या कृती समितीची स्थापना करण्यात आली. शासनाचा निर्णय आहे की, टोलनाक्यापासून २२ कि.मी. अंतरावरील गावांना टोल मुक्त करण्यात यावे, असे आदेश असतांना सुध्दा या गावांना टोल मुक्त केला जात नाही. या टोलनाक्यापासून जवळपास ३५ गावे येतात. येथील टोलनाक्यावरील अधिकारी व कर्मचारी नेहमीच शेतकर्‍यांना अरेरावीची भाषा करीत असतात. त्यामुळे या टोलनाक्यावर भोंगळ कारभारांविरोधात परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य एकत्र येवून कृती समिती स्थापना केली. या कृती समितीच्या माध्यमातून परिसरातील गावांना न्याय मिळवून देण्यात येईल.

संतोष रहेरे : अध्यक्ष - कृती समिती