महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे प्रा. औदुंबर मुळे यांची "करिअर कट्टा" लातूर जिल्हा समन्वयक पदी निवड..!

महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे प्रा. औदुंबर मुळे यांची "करिअर कट्टा" लातूर जिल्हा  समन्वयक पदी निवड..!

News15 मराठी अस्लम शेख 

लातूर : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रज्ञान विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या "करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी लातूर (ग्रामीण) जिल्ह्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून अहमदपुर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील गणित विषयाचे प्रा.औदुंबर मुळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र श्री. यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्याकडून महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.

महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीच्या नियमित अभ्यासक्रमा व्यतिरिक्त "करिअर कट्टा' या उपक्रमातून नोकरी किंवा उद्योगात करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून स्पर्धा परिक्षा व उद्योजकीय विकासासाठी प्रशासकीय अधिकारी तसेच उद्योगपती अथवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून  नियमित ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येते. त्यासाठी आ.ए.एस. आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला हे दोन उपक्रम राबविण्यात येतात. आ.ए.एस. आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षा, एमपीएससी, पोलीस भरती , स्टाफ सिलेक्शन कमिशन, केंद्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा (यूपीएससी) संदर्भात प्रशासकीय अधिकारी नियमितपणे मार्गदर्शन करतात. उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमातर्गत उद्योगजकीय व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापकीय कौशल्य व प्रत्यक्ष उद्योजकांचे मार्गदर्शन, वित्त व्यवस्था, निर्णय क्षमता, जोखीम व्यवस्थापन, मनुष्य व साधनसामग्री व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान संदर्भात यशस्वी उद्योजक व तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येते.

प्रा. औदुंबर मुळे हे स्वतः गणित विषयात राष्ट्रीय नेट परीक्षा पात्र असून ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आय. आय. टी. जॅम परीक्षा संदर्भात मागील सहा वर्षापासून सातत्याने वर्षभर निःशुल्क ऑनलाइन /ऑफलाईन मार्गदर्शन करत असतात. त्यामध्ये दरवर्षी विद्यार्थी यशस्वी होतात. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. किशनरावजी बेंडकुळे, सचिव अँड. पी. डी. कदम, सदस्य सुरेशरावजी देशमुख, प्राचार्य कॅप्टन डॉ. अनिता शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.पी.बी. बाभुळगावकर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.