स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या तरूणासाठी आनंदाची बातमी.! MPSC च्या इतिहासात प्रथमच 8 हजार पदांसाठी भरती...
NEWS15 प्रतिनिधी : पुणे
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिली असून, शासनाच्या विविध खात्याअंतर्गत हजारो पदांची जाहिरात MPSC ने प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्विटर हैंडल माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MAHARASHTRA DGIPR) या वरुन सांगण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने जाहिरात काढली आहे. आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.
फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा. या पद भरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
खालील विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती
1. सामान्य प्रशासन विभाग सहायक कक्ष अधिकारी ७० पदे
2. महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहायक कक्ष अधिकारी ८ पदे
3. वित्त विभाग राज्य कर निरीक्षक- १५९ पदे
4. गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक- ३७४ पदे
5. महसूल व वन विभाग- दुय्यम निबंधक (श्रेणी - २)/मुद्रांक निरीक्षक - ४९ पदे
6. गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - ६ पदे
7. वित्त विभाग तांत्रिक सहायक - १ पद
8. वित्त विभाग - कर सहायक - ४६८ पदे -
9. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये - लिपिक टंकलेखक - ७०३४
https://twitter.com/MahaDGIPR/status/1616447131291897858?s=20&t=il4fpiBINVCK2136Q2q7kg