पालखेड शाळेची सह्याद्री फार्म कंपनीला भेट.! क्षेत्रभेटीतून घेतला कंपनीच्या कामकाजाचा अनुभव
![पालखेड शाळेची सह्याद्री फार्म कंपनीला भेट.! क्षेत्रभेटीतून घेतला कंपनीच्या कामकाजाचा अनुभव](https://news15marathi.com/uploads/images/202410/image_750x_670e288aebd35.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी नुकतीच मोहाडी शिवारात असलेल्या सुप्रसिद्ध सह्याद्री फार्म कंपनीला भेट दिली.
या भेटीदरम्यान थिएटर रुममध्ये कंपनीच्या यशोगाथेचा व्हिडिओ पाहण्याचा आनंद मुलांनी घेतला. तसेच प्रत्यक्ष कंपनीचे कामकाज कसे चालते हे मुलांनी पाहिले.
यामध्ये प्रामुख्याने किसान केचअप, फ्रूट जाम यांची सुरू असलेली निर्मिती मुलांना कंपनीच्या प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून पाहता आली.यानंतर कंपनीच्या ज्यूस सेंटरला मुलांनी भेट दिली. याठिकाणी वेलकम ज्यूस देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले. कंपनीच्या कॅन्टीनमध्ये मुलांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
या क्षेत्रभेटीतून मुलांना एक प्रकारचे व्यावसायिक शिक्षण मिळाले व आपल्या आयुष्यात एक यशस्वी उद्योजक होण्याची प्रेरणा मुलांनी या क्षेत्रभेटीतून घेतली.या क्षेत्रभेटीसाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोविंद ढेपले, संजय सोनवणे,शिवाजी भोसले,रवींद्र काकुळते अमोल पवार,दिलीप झुरडे प्रशांत उनवणे, ज्ञानेश्वर वायाळ, सावंत,भारती भामरे,रोहिणी चव्हाण आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या क्षेत्रभेटीसाठी शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पीठे सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.