गोकुळ वडजे यांच्याकडून विद्यार्थ्यांचा सन्मान...

गोकुळ वडजे यांच्याकडून विद्यार्थ्यांचा सन्मान...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथे परनॉर्ड रिकॉर्ड इंडिया फाऊंडेशन आणि यूथ ड्रीमर्स फाऊंडेशनच्यावतीने; विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मडकीजांब विकास समितीचे गोकुळ वडजे यांनी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःला गरजेच्या वेळी मिळालेल्या मदतीची जाण पुढील आयुष्यभर ठेवावी. आपणास शक्य असेल त्या परीने समाजासाठी उत्तम कार्य करुन परतफेड करणे आवश्यक आहे; असे मार्गदर्शना प्रसंगी सांगितले. यूथ ड्रीमर्स फाउंडेशन चेअरमन टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना कष्ट चिकाटी प्रामाणिकपणा अंगी बाळगण्यास सांगितले. व प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले गुण मिळवून शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सुधाकर वडजे व आदर्श विद्यालयाचे देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी मडकीजांब विकास समितीचे गोकुळ वडजे, सरपंच रोहिणी मोरे, युथ ड्रीमर्स फाउंडेशनचे रमन टेकाळे, सुधाकर वडजे, विजय बोराडे, बाळासाहेब धुमणे, साहेबराव वडजे, शरद बोराडे, सचिन धुमणे, नितीन धुमणे, देशमुख आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत देशमुख यांनी केले. तर आभार पंकज जाधव यांनी मानले.