कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव यांना दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये अभिवादन...

कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव यांना दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये अभिवादन...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी संचालक शेकापचे नेते कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव यांच्या जयंती निमित्त दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस.एम.वीरकर यांनी "कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांच्या कार्याची माहिती सांगतांना भाऊ हे शेतकरी कुटुंबातले व्यक्तिमत्व असून सर्वगुणसंपन्नता त्यांच्यावर सरस्वतीने भरभरून ओतली होती. सातवीपर्यंतचे शिक्षण असून देखील एक शिक्षण प्रेमी,शिक्षण प्रसारक, समाज उद्धारक,अनाथांचा नाथ, आधारवड अशा अनेक विशेषणांचे खरोखर मानकरी असणारे भाऊ समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी म्हणजेच या भूमीच्या मातीसाठी लढत राहिले. कर्म करा फळ निश्चित मिळते अशा पद्धतीचे भाऊंचे कार्य होते. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत विविध शाखा विकासासाठी इमारत निधी जमा करण्यात भाऊंचा सिंहाचा वाटा आहे.

कादवा  सहकारी साखर कारखान्यात देखील संचालक म्हणून काम केले. गावच्या विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन पद,गावचे सरपंच पद भूषवले शेतकरी कामगार पक्षातून कार्य करत अनेकांचे राजकीय सहकार्य मिळवत कर्मवीरांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत कर्मयोगी एकनाथ भाऊंनी समाज उद्धाराचे कार्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश वडजे यांनी बोलतांना सांगितले की मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत बत्तीस वर्ष सेवेचे योगदान देणारा लढवय्या संचालक म्हणून कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ भाऊ दिंडोरी शाळेची इमारत असो वा तालुक्यातील कोणत्याही शाखेची इमारत असेल त्या इमारतींच्या बांधकामात विकासासाठी गावागावातील अनेक माणसे जोडून त्यांच्याकडून मिळेल तो निधी जमा करून विकासाची जागरूकता निर्माण करण्यात भाऊंचा हातखंडा होता. त्यांनी अनेक तडफदार विचारवंतांची एक फळी तयार केली व त्याचा वापर परिसर समृद्धीसाठी संस्था विकासासाठी करून घेतला ज्ञात अज्ञात अनेक सहकारी जोडून विकासाचा वारसा पुढे चालू ठेवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम. डी.अहिरे तर आभार एस.बी.मोगल यांनी मानले.