दिंडोरी येथील बालभारती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांना यश...
![दिंडोरी येथील बालभारती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांना यश...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66d30efb3d31f.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
मुक्तांगण संस्था व के.के.वाघ शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या गुरुशिष्य स्मृती माहे स्पर्धेअंतर्गत इंग्रजी व मराठी उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत दिंडोरी येथील बालभारती पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी आर्या नाठे व नंदिनी वाघरे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून यश मिळवले आहे.
त्यांनी विज्ञान व संगणक तंत्रज्ञान या विषयावर आपले विचार मांडले होते. याशिवाय इंग्रजी व मराठी कथा कथन स्पर्धेत कृष्णा पाटील व संस्कृती दाणी यांनी देखील उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नाशिक,दिंडोरी,निफाड सिन्नर,तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. या यशस्वी विद्यार्थ्यांना बालभारती पब्लिक स्कूलच्या प्रा. शुभदा कुलकर्णी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले,
यशस्वी विद्यार्थ्यांचे बालभारती पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रितम देशमुख,उपाध्यक्ष डॉ.विलास देशमुख सचिव संदीप शेटे आदींनी अभिनंदन केले.