क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात खेळाडूंना क्रीडा गणवेश वाटप...

क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात खेळाडूंना क्रीडा गणवेश वाटप...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप करण्यात आले.  

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.यावेळी   प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक शरद बोडके,सुभाष आव्हाड व राजेंद्र दरगोडे यांच्या हस्ते खेळाडूंना गणवेश वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे,डॉ.सुनील उगले,प्रा.शिवाजी साबळे,प्रा.सुनीता आव्हाड,प्रा.सुनीता बागुल,प्रा.पूजा उघडे,प्रा.वैशाली पगारे,प्रा.जना भोये,  प्रा.लक्ष्मण बागुल उपस्थित होते.

विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी दरवर्षी सहभागी होत असतात. त्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून  महाविद्यालयातील संघ सलगपणे तालुकास्तरावर खो-खो व कबड्डी स्पर्धेत विजयी राहिला आहे.  अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाच्यावतीने या वर्षी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी शरद बोडके म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्रीडा कौशल्य जोपासून राज्य पातळीपर्यंत भरारी घ्यावी व  महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे.    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप गांगुर्डे यांनी केले. तर आभार प्राध्यापक योगेश डंबाळे यांनी मानले.