वरखेडा सोसायटीची सभा खेळीमेळीत संपन्न...
![वरखेडा सोसायटीची सभा खेळीमेळीत संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66d30d4ceb4f1.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन दत्तात्रय उफाडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी माजी चेअरमन दशरथ पडोळ यांचे निधन झाल्याने त्यांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी व्हा. चेअरमन बाळासाहेब गांगुर्डे,संचालक प्रभाकर उफाडे,संजय उफाडे, विलास काळोगे,बाळकृष्ण निखाडे,सजन उफाडे, मनोहर पडोळ,विष्णू उफाडे, दशरथ उफाडे,अशोक कापसे आदी उपस्थित होते.संस्थेचे प्रभारी सचिव रामदास संवद्रे यांनी इतिवृत्ताचे वाचन करून अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली.
यावेळी वरखेडा मंडळ अधिकारी प्रिती अग्रवाल उल्लेखनीय काम केल्याबद्दल,तलाठी बाळासाहेब कांडेकर यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल तसेच जनता विद्यालयाचे शिक्षक नरेंद्र वड यांना मविप्र संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच धावपटू अक्षय ब्राह्मणे व हिरामण ब्राह्मणे यांनी २०२४ मध्ये विविध मॅरेथॉनमध्ये प्रथम आणि व्दितीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने चेअरमन दत्तात्रय उफाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच केशव वाघले, उपसरपंच राजेंद्र उफाडे त्र्यंबक उफाडे माजी चेअरमन राजेंद्र उफाडे कादवा सचालक बापु पडोळ स्कूल कमिटी अध्यक्ष प्रकाश भुसाळ पंचायत समिती माजी सदस्य वसंत भगरे तंटामुक्ती समिती माणिक उफाडे,उत्तम उफाडे,आर.डी.भुसाळ गणपत भुसाळ क्लार्क संभाजी सोनवणे,यांच्यासह संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.