जानोरी जी.प. प्राथमिक शाळेच्या शिक्षणतज्ञपदी संदीप गुंजाळ
![जानोरी जी.प. प्राथमिक शाळेच्या शिक्षणतज्ञपदी संदीप गुंजाळ](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66d0626aafe3d.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जि.प.प्राथमीक शाळेच्या शिक्षण तज्ञपदी संदीप गुंजाळ यांची फेरनिवड करण्यात आली.संदीप गुंजाळ यांनी या आधीही शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला असून मॉडेल शाळा करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याने त्यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले, अमोल जाधव,मनोज पाटील, आदींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.