मोहाडी येथे बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेकडून वृक्षारोपण...

मोहाडी येथे बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेकडून वृक्षारोपण...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री देवराई गोपालकृष्ण येथे प्रहार दिव्यांग संघटना मोहाडी व दिंडोरी यांनी; बच्चुभाऊ कडू यांच्या जन्मदिवासनिमित दिव्यांग बांधवांनी वृक्षलागवड करून निसर्गरम्य वातावरणात उत्साहात जन्मदिवस साजरा केला.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन व वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतल्याने इतरही लोकांना वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या या चळवळीत सामील होण्याची व पर्यावरण संरक्षण योगदान देण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा प्रहार दिव्यांग संघटना संपर्क प्रमुख सुखदेव खुर्दळ, तालुकाप्रमुख जयवंत थेटे, उपाध्यक्ष राजेंद्र शिंपी, तालुका सचिव विलास कदम, परसराम तिडके, भारत ढेपले, सतिश मंडलिक, वसंत तिडके, खतवडचे सरपंच श्री बबनराव दोबाडे, मोहाडी ग्रामस्थ व देवराई सदस्य उपस्थित होते.