राजगुरूनगरमध्ये PMRDA ची धडक कारवाई; अतिक्रमणांवर बुलडोझर, व्यापाऱ्यांमध्ये संताप...

राजगुरूनगरमध्ये PMRDA ची धडक कारवाई; अतिक्रमणांवर बुलडोझर, व्यापाऱ्यांमध्ये संताप...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, खेड

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत राजगुरूनगर येथे अतिक्रमणांवर आज PMRDA कडून अचानक मोठी कारवाई करण्यात आली. अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीय आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारीनंतर ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

या अचानक कारवाईमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. अनेक दुकानांवरील अतिक्रमण हटवताना मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व्यापाऱ्यांना सामान हटवण्यासाठी अत्यंत कमी वेळ देण्यात आल्याने गोंधळाचे आणि तारांबळीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या कारवाईविरोधात रिपाइं (आठवले) श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डोळस यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी PMRDA आणि पोलिस प्रशासनावर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करत या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 प्रशासनाची कारवाई की अन्याय? या प्रश्नावरून आता राजगुरूनगर परिसरात चर्चा रंगू लागली आहे