भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी
![भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_665c8c8182735.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
दि. 02 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी नियुक्त मतमोजणी निरीक्षक निरंजन कुमार आणि सागर चक्रबर्ती यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक मतमोजणी कक्षातील व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, प्रा. नितीन आगावणे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मतमोजणी निरीक्षक निरंजन कुमार आणि श्री. चक्रबर्ती यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय तयार करण्यात आलेले सहा मतमोजणी कक्ष, टपाली मतमोजणी कक्ष, ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर कक्षाची पाहणी केली. तसेच याठिकाणी मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सज्जतेचा आढावा घेतला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.