तहसीलदार पंकज पवार यांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा...

तहसीलदार पंकज पवार यांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा...

NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण 

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील सात दरड प्रवन क्षेत्र असून प्रशासनाने या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने उपाययोजना करण्यासाठी चर्चा विनिमय करून या क्षेत्रातील रहिवासी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दिंडोरी तालुक्यातील रडतोंडी  अहिवंतवाडी, चंडीकापूर, गोलदरी, मार्कंडेय, सूर्यगड, पिंप्रज या गावातील काही वस्ती ही दरडप्रवन क्षेत्रात येत असून या ठिकाणांना भूसक्खलन, दरड कोसळण्याच्या धोका आहे. ननाशी  जवळील रडतोंडी गावात  प्रांताधिकारी, पुलकितसिंह, तहसील दार पंकज पवार यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधत माहिती जाणून घेत ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या. गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आली असून संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करण्यात येवून नागरिकांचीही प्रबोधन करण्यात आले ज्या ठिकाणी जास्त धोका आहे तेथे जेव्हा अती पाऊस होईल अशा वेळी  नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.  

दिंडोरी तहसील कार्यालयात पूर्णवेळ आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला असून कोणत्याही प्रकारची आपत्ती घटना घडल्यास ०२५५७२२१००३ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवक,तलाठी यांनाही गाव पातळीवर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.जिथे दरी कोसळण्याचा,भुसक्खलणाचा धोका असेल त्या ठिकाणी राहू नये सुरक्षित स्थळी राहावे.पावसाळ्यात मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहू नये,कोणत्याही रस्त्यावरील मोरी फरशीवर पाणी असल्यास पुराचे पाण्यात जावू नये, पर्यटकांनी डोंगर दऱ्या धबधबे येथे भेट देताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी पुलकितसिंह,तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.