बांगलादेशी-ना मदत करणाऱ्यांना अटक करावी.! तहसीलदारांना निवेदन...

बांगलादेशी-ना मदत करणाऱ्यांना अटक करावी.! तहसीलदारांना निवेदन...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

देशाच्या दृष्टीने घातक असलेले व अनधिकृतपणे वास्तव्यास असलेले परदेशी घुसखोर यांना स्थानिक पातळीवर मदत करणारे गुन्हेगार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,याबाबतचे लेखी निवेदन दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना दिंडोरी शहरवासियांच्यावतीने देण्यात आले.

या निवेदनात म्हटले असे की,देशाच्या दृष्टीने घातक असलेले तसेच अनधिकृतपणे बांगलादेशी घुसखोर यांना मदत करणारे गुन्हेगार यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात तसेच दिंडोरी तालुक्यात अशा घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने या गुन्हेगारांचा शोध घेत,त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व दिंडोरीसह अनेक ठिकाणी बाहेरील,नागरिक भाडेतत्त्वावर वास्तव्यास असतात.त्यांची योग्यपणे चौकशी करण्यात येऊन त्यांना कोणत्याही प्रकारचे पाठबळ देऊ नये अशी मागणी शहराध्यक्ष भाजप नितीन गांगुर्डे,रनजित देशमुख,सुनील देशमुख आकाश देशमुख,सलीम मिर्झा,नाहीद मनियार राहाबाद अत्तार,हेमंत पगारे,प्रदीप घोरपडे, चंद्रकांत पाटील,अरविंद चंदनशिव, मनोज ढिकले,दीपक जाधव,अशोक निकम,शाकिब मिर्झा,उल्हास बोरस्ते आदींनी केली आहे.