पाटणबोरी आऊट पोस्ट पोलीस स्टेशन येथे; शांतता कमिटीची बैठक संपन्न...

पाटणबोरी आऊट पोस्ट पोलीस स्टेशन येथे; शांतता कमिटीची बैठक संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजु कैलासवार, पाटणबोरी (यवतमाळ)

पाटणबोरी येथील पोलीस आऊट पोस्ट येथे; दि. 6 सप्टेंबर 2023 रोजी शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाटणबोरी तंटामुक्ती अध्यक्ष अप्पाजी पोंक्षे हे होते; तर प्रमुख पाहुणे सरपंच सौ. नीता ताई उपरवार व परिसरातील पोलीस पाटील उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे यांनी येणाऱ्या सन उत्सव गोकुळाष्टमी, पोळा, गणेश उत्सव, ईद मिलाद व येणारे सण साजरे करतांना शांतता व सुव्यस्था बाळगून सण साजरा करण्याचे आवाहन केले. शासनाच्या नियम व अटी बाळगून  गणेश उत्सव साजरा करा असे आवाहन केले. या कार्यकर्माचे सूत्रसंचालन सचिन पत्रकार यांनी केले. तर आभार प्रदर्शन वसंता चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी केले.

सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून, यात सर्व समाज बांधव सहभागी होतात. त्यामुळे गणेश मंडळानी योग्य नियोजन करावे. सामाजिक सलोख्यात बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गणेश उत्सव काळात पुढे ईद मिलाद हा सण येत असून, शांतता भंग होईल असे कृत्य केल्याचे आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. तर शासनाचे नियम व अटीचे पालन करून सर्व सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले. या बैठकीला पाटणबोरीतील  गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार, गणमान्य नागरिक,पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.