गावाच्या एकीकरणातून गावचा विकास साधता येतो - साधवे
![गावाच्या एकीकरणातून गावचा विकास साधता येतो - साधवे](https://news15marathi.com/uploads/images/202501/image_750x_677677cb986d8.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
गावामध्ये एक संघता व एकजूटपणा असल्यास गावचा निश्चित विकास होतो त्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेणे आवक आवश्यक असल्याचे प्रतिपादन विस्तार अधिकारी बी.एस. साधवे यांनी केले.
ते पालखेड बंधारा येथे सोसायटी व ग्रामपंचायतच्यावतीने मान्यवरांचा सत्कार सोहळा कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कादवा कारखान्याचे माजी संचालक दिनकरराव गायकवाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारआर्थी ग्रामीण साहित्यिक कवी विठ्ठल संधान सत्कारार्थी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण,ज्ञानेश्वर ढेपले,ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, जऊळके उपसरपंच तुकाराम जोंधळे, पंचायत समिती सदस्य बेबी सोळशे, किसान सेल तालुका अध्यक्ष छबु मटाले, सरपंच रेखा गांगुर्डे,उपसरपंच बबलू गायकवाड, सोसायटीचे चेअरमन नाना गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
साधवे पुढे म्हणाले की आपण पालखेड बंधारा या गावांमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यशही आले त्यामध्ये गावाला संत गाडगेबाबा अभियानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. गावामध्ये सरपंच व ग्रामसेवक ग्रा.प. सदस्य एकत्र आल्यास गावचा विकास निश्चित होतो. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे गावातील वाचनालयाचा प्रश्न लवकरच आपल्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
यावेळी सोसायटी व ग्रामपंचायतीच्यावतीने बी.एस.साधवे यांची दिंडोरी पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा कादवाचे माजी संचालक दिनकरराव गायकवाड ग्रामपंचायतीच्यावतीने कर्मचारी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामीण कवी विठ्ठल संधान यांना ज्ञानगंगा बहुउद्देशीय संस्थेचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही सत्कार उपसरपंच बबलू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.युवा नेते ज्ञानेश्वर ढेपले हे विधानसभा निवडणुकीमध्ये निफाड तालुक्यात आमदारकी पदासाठी निवडणूक लढले होते त्याबद्दल त्यांचा सत्कार सरपंच रेखा गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांची दैनिक साई संध्या विदर्भच्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने त्यांचा ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्यावतीने मुख्याध्यापक बोराडे व राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष छबू मटाले यांच्या हस्ते जि.प.प्राथमीक मॉडेल शाळा मुख्याध्यापक प्रवीण खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर गायकवाड यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.जऊळके दिंडोरीचे उपसरपंच तुकाराम जोंधळे यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार बापू (तात्या) चव्हाण,उपसरपंच तुकाराम जोंधळे, विठ्ठल संधान,विजयकुमार मिठे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व सोसायटीचे व ग्रामपंचायतचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार चेअरमन ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मानले.
याप्रसंगी रघुनाथ गायकवाड,रमेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी प्रकाश बागुल मोहन गांगुर्डे,पंडित हरणखुरे,अन्वर सय्यद,मित्रानंद जाधव,रघुनाथ वाघ,गणपत गायकवाड,राजाराम सोळशे बाळासाहेब जाधव,सचिन गायकवाड,जयश्री चव्हाण,वैशाली गांगुर्डे,हुसेन सय्यद,शिवाजी गायकवाड,केदु गायकवाड, सोसायटीचे कर्मचारी संजय गुरुळे, मुख्याध्यापक एम.व्ही.बोराडे, गोविंद ढेपले,प्रतीक मिठे,ग्रामपंचायत कर्मचारी संदीप गायकवाड,भारत गोतरणे,साहेबराव गोतरणे,निलेश सोळसे,समाधान मीठे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.