कोसमतोंडी परिसरात मोबाईल कवरेज व इंटरनेट सुविधेचा अभाव.! लाडकी बहीण योजनेला विलंब...

कोसमतोंडी परिसरात मोबाईल कवरेज व इंटरनेट सुविधेचा अभाव.! लाडकी बहीण योजनेला विलंब...

 प्रतिनिधी - सुधीर शिवनकर, गोंदिया

सडक अर्जुनी तालुक्यापासून २५ किमी. लांब अंतरावरील कोसमतोंडी गावात व परिसरातील धानोरी तसेच जवळील गावात मागिल दिड-दोन महिन्यापासून इंटरनेट सुविधा खंडीत असल्याने, मोबाईल व इंटरनेटवर होणारी कामे वेळेवर होत नसल्याने लोकांचा मनस्ताप वाढत आहे.

नुकतीच राज्य शासनाने  लाडली बहिन योजना सुरू केली आहे. लाडली बहिन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका व सेतू केंद्र धारकांना आनलाॅईनचे काम सोपविले आहे. तसेच कार्यालयीन कामकाज असो किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासा संदर्भात कामे असोत; ही सर्व कामे इंटरनेट सुविधेने थांबली आहेत. कोसमतोंडी गावात  ग्रामपंचायत, एक केंद्र प्राथमिक शाळा, दोन महाविद्यालय, तलाठी कार्यालय व महाराष्ट्र बॅकेची शाखा आहे. पण इंटरनेटच्या असुविधेमुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

महत्वपूर्ण कामासाठी भर पावसाळ्यात नागरिकांना व विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कामे करावी लागत आहेत. जे काम घरून व गावातून होत असत; त्या कामासाठी संगणक इंस्टीट्युटमध्ये जाऊन जास्तीचा खर्च करावा लागत आहे. पण तिथेसुद्धा कार्यलयीन कामे व लाडली बहिन योजनेचे फाॅर्म भरण्यासाठी तहसील कार्यालयातील संगणक इंस्टीट्युटमध्ये अनेकदा जावे लागत आहे. आधी कोसमतोंडी येथे बीएसएनएलची सुविधा सुरळीत सुरू होती. पण ती आज हद्दपार झाली आहे. त्यातच खाजगी कंपनीने नागरीकांना जबरदस्त स्पीड देऊ असे सांगून मोठ्या प्रमाणात ग्राहक बनवून सुद्धा खाजगी सेवा आज खंडीत आहे. आणि आता नागरीकांना बीएसएनएल ची आठवण येत आहे.