चाकण मधील बिल्डर वसाहत उभी करताना आपल्याला फसवत तर नाही ना?

चाकण मधील बिल्डर वसाहत उभी करताना आपल्याला फसवत तर नाही ना?

News15 प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : सध्या चाकण आणि परिसरात बिल्डर यांच्या कडून वसाहत धारकांची फसवणूक होतानाचे प्रकार समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे वसाहतीचे काम अर्धवट असतानाच गृह निर्माण संस्था स्थापन करण्याचा घाट घालणे, ज्या बिल्डर आणि सदनिका धारक यांच्यात अग्रिमेंट होते त्यातील सुविधा देण्याचे ठरलेले असते त्यांची पूर्तता न करताच सदनिका धारक यांची दिशाभूल करून गृह निर्माण संस्था स्थापन करणे. काही ठिकाणी वसाहतीचे बांधकाम पूर्ण होऊनही वसाहत धारकांशी कन्व्हेयन्स डील करण्यास चाल ढकल करून पुढे वाढीव एफएसआयचा फायदा घेऊन स्व:तचा आर्थिक लाभ करून घेणे.

 

इतकेच नाही तर चाकण परिसरातील काही बिल्डर यांनी वसाहत धारकांच्या डोळ्यात धूळ फेकून वसाहतीचा ओपन स्पेस आणि अमुनिटि स्पेसची स्परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे News15 मराठी वाहिनीकडे प्राप्त झाले आहे. वसाहत उभी राहण्याच्या अगोदरच बिल्डरणे ओपन स्पेस आणि अमुनिटि स्पेस स्परस्पर विकला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओपन स्पेस आणि अमुनिटि स्पेसची विक्री करण्यासाठी वेगळा आराखडा दाखवला आणि प्रत्येक्षात त्याच अकृषिक क्षेत्रावर दुसर्‍या आराखड्याला मान्यता घेऊन वसाहत उभी करण्याचा घाट काही चाकण मधील बिल्डरांनी घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मागील काही दिवसापूर्वी लोक प्रतिंनिधी यांनी लक्ष घातले होते. त्यावर अद्याप अजूनही काही कार्यवाही झाल्याचे दिसले नाही. पण यामुळे सदनिका  धारकांची मोठी फसवणूक झाल्याचे चर्चा रंगली आहे.

 

एखादा बिल्डर कन्व्हेयन्स डील करण्यास चालढकल करत असेल तर त्यावर रजिस्टर गृहनिर्माण वसाहत धारकांणी पुढे जाऊन डिम्ड कन्व्हेयन्स करून तुम्ही तुमचा गृहनिर्माण संस्थेवर तुमचा कायदेशीर हक्क मिळवू शकतात. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून रजिस्टर गृहनिर्माण कार्यकारणीने कायदेशीर मदत घेऊन डिम्ड कन्व्हेयन्स करून घेण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.  

 

काही स्थानिक पुढार्‍यांना हाताशी धरून बिल्डर असे उपद्याप करत असल्याचे समोर आले आहे. बिल्डर याच पुढार्‍यांना पुढे करून असे काळे कारनामे करून मोठी आर्थिक उलाढाल करत असल्याचे दिसून आले आहे. हा विकलेला ओपन स्पेस आणि अमुनिटि स्पेस याची कोणत्याही प्रकारची बिल्डरच्या दफ्तरी नोंद दिसत नाही. पण ज्या व्यक्तिला असे भूखंड विकले त्या व्यक्तीने तातडीने महसूल दफ्तरी स्व: ताचे नाव चढवल्याचे दिसून येते. त्यामुळे बिल्डर सदनिका धारक यांची फसवणूक करून आर्थिक लाभ घेऊन मोकळा होत आहे. पण यात आयुष्याची जमा पुंजी लावून स्व:ताच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार्‍या सदनिका धारकाची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यावर लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार ? हेच पहावे लागेल. नाहीतर भविष्यात वसाहत धारकांना बिल्डर विरोधी मोठा संघर्ष उभा करावा लागेल यात शंका नाही.