कोराटे येथे संघर्ष क्रिकेट क्लबच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन....!
![कोराटे येथे संघर्ष क्रिकेट क्लबच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन....!](https://news15marathi.com/uploads/images/202301/image_750x_63d1342d68224.jpg)
News15 मराठी प्रतिंनिधी बापू चव्हाण
तालुक्यातील कोराटे येथे आज दि.२६ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्ताने संघर्ष क्रिकेट क्लब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९:०० वा. कोराटे येथील जनता विद्यालय शेजारील प्रांगणात या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी उद्घाटक म्हणून मविप्रचे संचालक प्रवीण जाधव शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग गनोरे सोसायटीचे व्हाईस चेअरमन विष्णु शिंदे, बाळासाहेब कदम, उपसरपंच बाळासाहेब कदम,रवींद्र कदम रामनाथ कदम,गोरख शिंदे,दिगंबर शिंदे,प्रशांत कदम,आदिसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ३१००१ रुपये चषक प्रवीण नाना जाधव यांच्याकडून द्वितीय पारितोषिक २१००१ रुपये चषक स्वराज्य ऍग्रो मॉल दळवी व मंगेश कदम यांच्याकडून तृतीय पारितोषिक ११००१ रुपये चषक पांडुरंग गनोरे यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक ८००१ रुपये चषक विष्णु शिंदे व्हाईस चेअरमन सोसायटी यांच्याकडून पाचवे पारितोषिक नाना गोविंद कदम यांच्या स्मरणार्थ ७००१ रु. चषक सम्राट ग्रुप यांच्याकडून साहवे पारितोषिक ७००१ रुपये चषक मधुकर शिंदे यांच्याकडून देण्यात येणार आहे तर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीसाठी २५०० रुपये चषक व मॅन ऑफ द मॅच २५०० रुपये चषक व चषक मॅन ऑफ द सिरीज २५०० रुपये व चषक देण्यात येणारा असून स्पर्धेमध्ये फक्त ४८ संघांना भाग घेता येणार आहे.तरी परिसरातील क्रिकेट स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन सोमनाथ कदम,अंबादास कदम, शरद बदादे, बाबा कदम यांनी केले आहे.