जानोरी जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा...
![जानोरी जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_64fc2023cea77.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेत.! गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गोपाळकाला दहीहंडी उत्सवानिमित्त; विद्यार्थी श्रीकृष्ण आणि राधाच्या वेशभूशेत शाळेत आले होते. यावेळी गोविंदाच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
यावेळी विद्यार्थ्यांना दहीहंडीचे महत्त्व व गोपाळकाला याविषयी माहिती देण्यात आली. पावसासाची हजेरी व डीजेच्या तालावर विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, शिक्षिका लीना गोसावी, वंदना गरुड, प्रमिला कापडणीस, मनीषा गायकवाड, प्रिया वरोडे, मंदा पिंपळे, मंगला ठाकरे आदी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.