भातोडे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका; ज्योती आहिरे यांना नवोपक्रमासाठी राष्ट्रीय पुरस्कार...

भातोडे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका; ज्योती आहिरे यांना नवोपक्रमासाठी राष्ट्रीय  पुरस्कार...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

दिंडोरी : राष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील भातोडे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका ज्योती आहिरे यांना राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचेवतीने देशात शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या घटकासाठी राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन केले.या स्पर्धेसाठी एकूण ६० नवोपक्रमाची नोंद झाली.एन सि ई आर टीच्या वतीने प्रत्यक्ष जाऊन नवोपक्रमाची पडताळणी करण्यात आली.त्या सर्व उपक्रमातून अंतिम फेरीसाठी २६ नवोपक्रमाची निवड करण्यात आली.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत दि.१८जुलै 23 मंगळवार रोजी NCERT Delhi येथील चाचा नेहरू भवन (CIET भवन)येथे नवोपक्रमाचे सादरीकरण आयोजित करण्यात आले. याप्रसंगी डॉ.शरद सिन्हा (Head, Department of education ) बी.पी.भारद्वाज साहेब (program coordinator, NCERT) उपस्थित होते.यावेळी सादर केलेल्या प्रकल्पांचे मूल्यमापन ( jury members) प्रोफे.सिन्हा, प्रोफे.सुजाता श्रीवास्तव व प्रोफे.डॉ. विजयन यांनी केले.रोजी शिक्षकांच्या उपक्रमाचे सादरीकरण घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील दिंडोरी तालुक्यातील भातोडे शाळेच्या ज्योती आहिरे यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारसाठी अंतिम २६ मध्ये निवड झाली.महाराष्ट्रतील एकमेव असून जिल्हा परिषदेच्या शिक्षिका म्हणून राष्ट्रीय स्तरावर डंका वाजला आहे.आहिरे यांनी दिल्ली येथे त्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सादरीकरण केले.

प्रारंभी देशातून ६० नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय पुरस्कारसाठी निवड झाली महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी मुली केंद्रातील जिल्हा परिषद भातोडे शाळेच्या ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या गणित संबोध सुलभ होण्यासाठी अबकसचा वापर या नाविन्यपूर्ण उपक्रमाची निवड झाली आहे."ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये गणितीय बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी अबॅकस या प्राचीन तंत्राचा वापर करणे "नॅशनल टीचर्स अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस अँड एक्सपेरीमेंट्स इन एज्युकेशन'या स्पर्धेमध्ये उपक्रमाचा विषय आहे.जिल्हा परिषदेच्या भातोडे शाळेतील ज्योती आहिरे यांनी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला व त्याचे सबमिशन राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन,ऑफलाईन पध्दतीने केले.देशातून आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून ६० उपक्रमाची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी निवड झाली आहे.त्यानंतर Ncert चे पथक कार्यक्रम समन्वयक डॉ. बी पि भारद्वाज यांनी भातोडे शाळेला भेट देऊन उपक्रमाची पडताळणी केली.एनसीआरटी दिल्ली द्वारा आयोजित 'नॅशनल टीचर्स अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस अँड एक्सपेरीमेंट्स इन एज्युकेशन'या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातोडे,ता.दिंडोरी,येथील उपशिक्षिका ज्योती अहिरे यांनी यांनी सादर केलेल्या नवोपक्रम आराखड्याची निवड करण्यात आली.

संपूर्ण देशभरातून स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करण्यात आले होते. त्यापैकी महाराष्ट्रातून या एकमेव नवोपक्रमाची निवड झाली आहे. गणित हा विषय कठीण असल्याने तो लहानपणापासून सोपा जावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे,यासाठी हा विषय अबॅकसच्या साह्याने वेगळ्या पध्दतीने शिकवता येतो.अबॅकसच्या अभ्यास पद्धतीमुळे मुलांच्या दैनंदिन अभ्यासामध्ये मोठा बदल जाणवतो. विद्यार्थी अतिशय हुशारीने आकडेमोड करतात.त्यामुळे मेंदूविकास होण्यास नैसर्गिकपणे मदत होते. या नवोपक्रमासाठी त्यांनी आपल्या वर्गातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना अबॅकस या विषयाचे अध्यापन केले.अबॅकस हा विषय आपल्या ग्रामीण आदिवासी परिसरात संपूर्णतः नवीन आहे.यासाठी शिक्षकांनी स्वतः अबॅकस शिकून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचे अध्यापन केले. या नवोपक्रमाच्या पडताळणीसाठी एनसी आरटी दिल्ली येथील सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातोडे येथे भेट दिली.यासाठी शाळेतील सर्व सहकाऱ्यांचे त्यांना सहकार्य लाभले. "  भातोडे शाळेच्या  ज्योती आहिरे यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाल्याने इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी असून तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. चंद्रकांत गवळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दिंडोरी

 प्रतिक्रिया

"विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची असून,तंत्राचा वापर करून गणित अध्यापन सुलभ झाले. या उपक्रमबाबत राष्ट्रीय पुरस्कारसाठी आयोजित अद्भुत अशा कार्यक्रमात मला सहभागाची संधी मिळाली.माझ्या सारख्या सामान्य शिक्षकासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता."

ज्योती अहिरे क्रमशिल शिक्षिका (भातोडे)