शिवपूर जिल्हा परिषदेचे शिक्षक बालाजी जगताप हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त...

शिवपूर जिल्हा परिषदेचे शिक्षक बालाजी जगताप हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त...

NEWS15 प्रतिनिधी : सुधाकर सूर्यवंशी 

लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बालाजी जगताप हे 33 वर्षाच्या सेवेनंतर, सेवानिवृत्त झाले. त्यांच्या यासेवाकार्यानिमित्त शाळेकडून व इतर मान्यवराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त केंद्रप्रमुख शिवाजी एरंडे, विठ्ठल वाघमारे, शालेय समितीचे सदस्य नितेश कांबळे, परमेश्वर तोंडारे, दिलीप पाटील, तानाजी जगताप, संगमेश्वर शिवणे, गणेश पाटील, श्री उस्तुरगे सर यांच्यासह ग्रामस्थ व तालुक्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.