जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास मिळते : आ.बाबासाहेब पाटील

जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास मिळते : आ.बाबासाहेब पाटील

NEWS15 प्रतिनिधी : सलम शेख

लातूर : चाकूर तालुक्यातील मष्णेरवाडीची कन्या रेणुका सलगर हिने राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या दुय्यम, कर, उद्योग निरीक्षक.! या तीन परीक्षेत यश प्राप्त केले असून, या उत्तुंग यशाबद्दल तिच्या आणि आई - वडिलांचे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच रेणुका सलगर हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मष्णेरवाडी (ता. चाकूर) या छोट्याशा गावात वडील मजुरी करतात, आई शेळ्या राखून उदरनिर्वाह भागविते. परिस्थिती हालाखीची असतानाही तिने मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे. अहमदपूर चाकूर तालुक्यासह ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेणुकाने आदर्श निर्माण केला आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अहमदपूर - चाकूरचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली. मतदारसंघात असे होतकरू आणि हुशार विद्यार्थी आहेत, याचा मला अभिमान वाटतो. जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास मिळते, असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रसंगी अजनसोंडा सरपंच देविदास माने, सरपंच व्यंकटराव हाके पाटील, उपसरपंच राजाराम देवकते, रेणुकाचे बंधू कृष्णा सलगर, आई सौ.शोभाताई गोविंद सलगर, धारबा पाटील, अजीज शेख, व्यंकट देवकते, पोलीस पाटील गुणवंत पाटील, गोविंदराव हाके, खंडू मारकड, कोंडीबा सुळ, मंचक पाटील, भगवान हाके, बनारस देवकते, पांडुरंग देवकते, विकास हाके, नामदेव हाके, ग्रामसेवक शेटवार आदी मान्यवर उपस्थित होते.