राज्य शिक्षण आयुक्त साहेब ज्या विद्यालयाची मान्यताच बोगस आहे अशा विद्यालयावर आपण कारवाई करणार का? की फक्त बघ्याची भूमिका घेणार? आपले उत्तम काम सर्व राज्याने पाहिले आहे....!

संस्थेच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह?

राज्य शिक्षण आयुक्त साहेब ज्या विद्यालयाची मान्यताच बोगस आहे अशा विद्यालयावर आपण कारवाई करणार का? की फक्त बघ्याची भूमिका घेणार? आपले उत्तम काम सर्व राज्याने पाहिले आहे....!
राज्य शिक्षण आयुक्त साहेब ज्या विद्यालयाची मान्यताच बोगस आहे अशा विद्यालयावर आपण कारवाई करणार का? की फक्त बघ्याची भूमिका घेणार? आपले उत्तम काम सर्व राज्याने पाहिले आहे....!
राज्य शिक्षण आयुक्त साहेब ज्या विद्यालयाची मान्यताच बोगस आहे अशा विद्यालयावर आपण कारवाई करणार का? की फक्त बघ्याची भूमिका घेणार? आपले उत्तम काम सर्व राज्याने पाहिले आहे....!

News15 प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : मागील काही दिवसापासून News15 मराठीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील बर्‍याच बोगस शिक्षण संस्था व विद्यालयांत चालू असलेले काळे कारनामे यांच्या बाबत अनेक धक्कादायक माहिती बाहेर काढली होती. त्यावर राज्य शिक्षण विभाग व पुणे माध्यमिक शिक्षण विभाग फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.

याच शिक्षण विभागाच्या बघ्याच्या भूमिकेमुळे कुठे तरी शिक्षण विभागातील काही अधिकारी यांची संस्था चालक यांच्याशी आर्थिक तडजोड होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याच प्रकरणातील चाकण परिसरातील बिरदवडी गावातील बाबुराव पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मोठा बोगस कारभार News15 मराठी वाहिनीने बाहेर काढला होता. त्या संदर्भात संस्थेच्या अध्यक्षा देवयानी पवारविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक विजय चव्हाण, शिक्षक अनिल चौगुले यांच्यावर शिक्षण विभागाने चालढकल म्हणून प्राथमिक दिखावा म्हणून कारवाई केल्याचे पत्र संस्थेला दिले होते. पण त्यातील एक म्हहत्वाची बाब म्हणजे ज्या संस्थेला माध्यमिक शिक्षण विभागाने करवाईचे पत्र दिले जी व्यक्ति कारवाई करणार तीच व्यक्ति कारवाई करण्यात आलेल्या रेशन चोरी प्रकरणात दोषी असल्याने नक्की ती शिक्षण विभागाच्या पत्रावर कार्यवाही करू शकते कायाची कोणतीही शहानिशा माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे नामक अधिकारी यांनी केली नसल्याचेही दिसून आले आहे.

या संस्थेचा येवढाच कारनामा नाही तर मागील २० वर्षापासून संस्थेच्या कर्मचारी यांची सेवा पुस्तकेच पूर्ण केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरीही माध्यमिक शिक्षण विभाग याकडे डोळेझाक करून आर्थिक तडजोडी करून सेवा पुस्तके पूर्ण नसतानाही शासनाची फसवणूक करून या व्यक्तीचा माशिक पगार काढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याला फक्त संस्थाच नाही तर याला पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागही तितकाच जबाबदार असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. यात विशेष म्हणजे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे नामक अधिकारी याच्याकडून समक्ष भेटून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मला वेळ नाहीमी कामात आहेमला माहिती घ्यावी लागेलमी प्रकरण बघते असे उपरोक्त उत्तरे मिळत आहेत. म्हणजे यात कुठे तरी आर्थिक तडजोडी होत असल्याचे दिसून येत आहे. यात विशेष म्हणजे सध्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज माढरे हे अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. तसेच जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हेही कामकाजात कुठेही दिरंगाई होणार नाही याची बारीक काळजी घेत असतात. पण त्यांच्या अंतर्गत काम करत असलेल्या सुनंदा वाखारे सारख्या अधिकारी यांच्या बद्दल आयुष प्रसाद हे का झुकते माफ देत असतील यावर मात्र मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

या बाबुराव पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ज्या जागेवर उभे आहे ती जागाच संस्थेच्या नावावर नसल्याचा पुरावा News15 मराठी वाहिनीकडे असूनही आणि त्यावर News15 मराठी वाहिनीने आवाज उठवून शिक्षण विभाग अजून का डोळे झाकून बसला आहे हाच अणुउत्तरीत प्रश्न आहे. एवढेच नाही तरया बोगस संस्थेला शासनाची १०० टक्के मान्यता असल्याने नक्की शिक्षण विभागातील अधिकारी यांनी लाखो रुपयांची आर्थिक तडजोड केल्याचे दिसून येतं आहेयात तत्कालीन शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांचेही नाव प्रकर्षाने समोर येत आहे. असे कारनामे जर शिक्षण विभागाचे अधिकारी लाखोच्या तडजोडी करून चुकीची कामे करत असतील तरहा महाराष्ट्रातील शिक्षण विभागाला कलंकित करणारे कृत्यच म्हंटले तरी वावघे ठरणार नाही.

या संस्थेत अजूनही असे अनेक कारनामे आहेत जे की News15 मराठीने समोर आणली आहेत. या संस्थेसारख्या खेड तालुक्यात अजूनही अशा बोगस संस्था व त्यात असे बोगस कारनामे घडत आहेत त्यावर कर्तव्यदक्ष राज्य शिक्षण आयुक्त सूरज माढरे साहेब व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या बोगस संस्थेची चौकशी करून कारवाई करणार काआणि अशा बोगस धेंड्यांना जेलची हवा खायला पाठवणार काअशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांच्या कडून होताना दिसत आहे. या प्रकरणाच्या संदर्भात News15 मराठी सर्व पुराव्यासह शिक्षण विभागाला सहकार्य करायला तयार आहे. फक्त शिक्षण विभागाने कारवाई करण्याची तसदी घ्यावी हिच अपेक्षा...!

निर्भीडता हिच आमची ओळख, News15 मराठी