दिंडोरी येथील मित्र मंडळ सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने, आजपासून विचारधन व्याख्यानमाला...

दिंडोरी येथील मित्र मंडळ सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने, आजपासून विचारधन व्याख्यानमाला...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील मित्र मंडळ सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने; दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विचारधन व्याख्यानमाला या ग्रंथ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पासून रविवार २० ऑगस्ट ते शुक्रवार दि. २५ऑगस्ट या कालावधीत रोज सायंकाळी ६.३० वा. विचारधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

या व्याख्यानमालेत आज रविवार दि. २० रोजी सुप्रसिध्द कवी व सुत्रसंचालक रविंद्र मालुंजकर यांचे ‘वाचु आनंदे, सोमवार दि. २१ रोजी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी.आर.ढोकणे यांचे ‘शेती वादासाठी की संवादासाठी व विद्यार्थी नोकरीक्षेत्रामध्ये नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेटचे महत्त्व’, मंगळवार दि. २२ रोजी परम करिअर अकॅडमी संचालक ज्ञानेश्‍वर राठोड यांचे ‘स्पर्धा परिक्षा आणि करिअर’, बुधवार दि. २३ रोजी सुप्रसिध्द कवी व अभिनेता राजेंद्र उगले यांचे ‘स्वत:ला समजून घेतांना’, गुरुवार दि. २४ रोजी सुप्रसिध्द आध्यात्मिक व ज्योतिष वक्ते मुकुंद कुलकर्णी यांचे ‘संस्कारातून समृद्धी’, शुक्रवार दि.२५ रोजी ‘स्वातंत्र्य चळवळीती इतिहाकार गजानान होडे यांचे, नाशिक जिल्ह्यातील क्रांतीकारकांचा इतिहास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

तरी शहरातील तरुण, ज्येष्ठ नागरीक, साहित्यिक, वाचक, विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेस उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष तहसीलदार पंकज पवार, पदसिध्द नगराध्यक्षा मेघा धिंदळे, विश्‍वस्थ मुख्याधिकारी वैभव लोंढे, कार्याध्यक्ष चंद्रकांत राजे, खजिनदार अशोक मोरे, विश्‍वस्थ सुनील आव्हाड, अशोक निकम, हेमंत पवार, अनिल देशमुख, संजय घोरपडे, डॉ.अतुल बुरड, विलास देशमुख, विजय पिंगळ, डॉ.शिल्पा देशमुख आदींनी केले आहे.