BIG BREAKING : खराबवाडी गावात २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या...!

BIG BREAKING : खराबवाडी गावात २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या...!

News15 मराठी आशिष ढगे पाटील 

चाकण : खराबवाडी गावातील अभिनव हॉस्पिटल जवळ भाड्याने राहत असलेल्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीवरून, सपना जाधव(वय-२२ वर्षे)रा. किनवट, जि. नांदेड असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. घटनास्थळी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.