विद्येचे माहेरघर पुण्यात.! 73 वर्षांच्या वृद्धाकडून तरुणीचा विनयभंग... आरोपीला अटक
विद्येचे माहेरघर अर्थात पुण्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली असून, या घटनेने वयाच्या सर्व सीमा ओलांडून माणुसकीला काळिमा फासली आहे. पुण्यातील एका 73 वर्षीय वृद्धाने दवाखान्यातील रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या घटनेने पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
"माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो, तुला जे हवे ते मी देतो, पण तू मला पाहिजे ते कर. असं वृद्ध 27 वर्षीय तरुणीला म्हणाला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ दवाखाना सोडला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक केली आहे.
सविस्तर घटना अशी की, 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. क्लिनिकमध्ये 73 वर्षीय सुरेशचंद चोरडिया नावाचा वृद्ध रुग्ण म्हणून आला होता, क्लिनिकमध्ये त्या दिवशी रिसेप्शनवर एकटीच तरुणी उपस्थित होती. ही संधी साधत आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले. त्याने अचानक रिसेप्शनिस्टच्या गालाला हात लावत "पप्पी दे" अशी मागणी केली. यानंतर खिशाकडे हात दाखवत म्हणाला, "माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो, तुला जे हवे ते मी देतो, पण तू मला पाहिजे ते कर. तरुणी घाबरून क्लिनिकमधून पळाली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ क्लिनिक सोडलं आणि बाहेर पळ काढला. मात्र वृद्धाने तिला पाठलाग करत, "उद्या क्लिनिकमध्ये आहेस का?" असा प्रश्न विचारत तिला त्रास दिला.