आषाढी एकादशी निमित्त फुले महाविद्यालयाची सामाजिक समता दिंडी.! विठू नामाचा गजराने दुमदुमली अवघी किनगाव नगरी...

आषाढी एकादशी निमित्त फुले महाविद्यालयाची सामाजिक समता दिंडी.! विठू नामाचा गजराने दुमदुमली अवघी किनगाव नगरी...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी (२५) वर्षानिमित्त आयोजित आदर्श सेमी इंग्लिश स्कूल आणि महात्मा फुले वरिष्ठ महाविद्यालय किनगाव'च्या संयुक्त विद्यमाने; आषाढी एकादशी निमित्ताने रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ८ वाजता किनगाव नगरीच्या प्रमुख रस्त्यावरून बालगोपालांची पर्यावरण, संविधान, सामाजिक समता दिडी काढण्यात आली होती. या दिंडीतील प्रति विठ्ठल- रुक्मीणी'च्या वेशातील बाल गोपाळ यांची पुजा श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बबनराव बोडके यांच्या शुभहस्ते पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.

त्यानंतर पर्यावरण संर्वधन, संविधान जनजागृती आणि सर्व जाती धर्मात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संदेशपर विठू नामाचा गजर अवघी दुमदुमली किनगांव नगरी या उक्तीप्रमाणे किनगाव'च्या प्रमुख रस्त्यावर जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या जयघोषात समस्त मानव जातीला हे विश्व ची माझे घर हा संदेश देण्यासाठी दिंडी काढण्यात आली.

या दिंडी मध्ये प्राचार्य डॉ. बबनराव बोडके, उपप्राचार्य डॉ. विठ्ठल चव्हाण ,नॅक समन्वयक प्रा. डॉ. अनंत सोमवंशी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विरनाथ हुमनाबादे,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. भारत भदाडे, प्रा. डॉ. प्रभाकर स्वामी, प्रा. बालाजी आचार्य, प्रा. संजय जगताप, प्रा. पांडूरंग कांबळे,डॉ. सदाशिव वरवटे, आदर्श सेमी इंग्लीश स्कूल चे प्राचार्य डॉ. संतोष पवार,आदि सह विद्यार्थी प्रतिनिधी कु तुकाराम पांचाळ, सोमनाथ नागरगोजे, अंकूश केंद्रे, विनय लामतुरे, अभिजीत कांबळे विद्यार्थीनी प्रतिनिधी कु अलका नागरगोजे , स्नेहा आचार्य आदिनी सक्रिय सहभाग घेत रिंगण करून दिली पाऊल खेळत फुगडी धरून प्रेम मैत्री बंधुत्वाची सद् भावना, राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम केले आणि किनगांवकरांच्या मनात रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संदेश दिला.