चिमुकल्याने पार केले ३७ गडकिल्ले...!

चिमुकल्याने पार केले ३७ गडकिल्ले...!

News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण 

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील अंश अभिमन्यू देशमुख या अवघ्या तीन वर्षांच्या बालकांने आतापर्यंत जवळजवळ ३७ वेगवेगळ्या स्वरूपांचे गडकिल्ले पायी प्रवास करून पार केल्याने त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.

प्रत्येकांला कोणत्या ना कोणत्या छंद जोपासण्याची हौस असते. परंतु अत्यंत कमी वयात आपला छंद जोपासने म्हणजे एक प्रकारे नवलंच म्हणावे लागले हि किमया केली आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील अवघ्या तीन वर्ष असणाऱ्या अंश अभिमन्यू देशमुख या चिमकुल्या बालकांने यांने आता ३७ गडकिल्ले पायी प्रवास करून सर केले आहेत. बालपण हे खेळण्या बागडण्यात जाते.परंतु अंश हा ध्येय गाठण्यासाठी खेळाकडे दुर्लक्ष करीत गडकिल्ले याची माहिती घेऊन ते कसे पार करायचे या शोधात असतो. यांचे मार्गदर्शन तो आपले वडील अभिमन्यु देशमुख यांच्याकडून घेत असतो.

अवघ्या वयाची अडीच वर्ष पार केल्यानंतर दिंडोरी तालुक्यातील रामशेज या ऐतिहासिक किल्ल्यापासून आपल्या मोहिमेला प्रारंभ केला. तेव्हा पासून आजपर्यंत जवळजवळ ३७ गडकिल्ले पायी प्रवास करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आपल्याकडे वळुन घेतले. आतापर्यंत सर्वात खडतर व अवघड असे घोडप,मार्केंड्य,शिवनेरी, रायगड, रतनगड, देहरगड, मीरागड, हरगड, भैरवगड (मोरोशी),अलंग, मदन, कुलंग,साल्हेर मुल्हेर डोंगर,हरीहर तसे अनेक गडकिल्ले अंशने सहज सर केले आहे.

गडकिल्ले पार करण्यासाठी तो नेहमी आपला सुट्टीचा दिवस निवडतो. सुट्टीचा दिवस आला आहे की आपल्या परिवारातील कोणांला तरी बरोबर घेऊन तो गडकिल्ले सर करण्यासाठी निघत असतो. त्याच्यावर जो विचारांचा प्रभाव पडला तो शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा. त्यांची प्रेरणा घेऊन गड कसे असतात. त्यांचा अभ्यास कसा करावा हेच ध्येय मानुन अंश हा अनेक खडतर गडकिल्ले सहज पार करून सर्व नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. जे गड पार करण्यासाठी जेव्हा तो जातो तेव्हा तिथे अत्यंत कमी वयात एवढी मोठी ध्येयवादी भावना पाहून अनेक ठिकाणी त्यांचे नवीन नवीन हजारो मित्र परिवार निर्माण झाला आहे.

सुट्टीचा दिवस गडकिल्ले पार करण्यासाठी सुट्टीचा दिवस मुलांना विविध खेळण्यासाठी मिळतो. परंतु अंश देशमुख या चिमकुल्या बालकांला सुट्टीचा दिवस म्हणजे गडकिल्ले पार करण्यासाठी पर्वकाळ समजला जातो. सुट्टीच्या दिवशी आपले वडील किंवा आपल्या परिवारातील कोणाला तरी बरोबर घेऊन गडकिल्ले पार करण्यासाठी निघत असतो. सर्व प्रथम अंशने बालवयात चिखल मातीपासून किल्ले देखावे निर्माण केले होते. तेव्हा पासून अंश व गडकिल्ले यांचे नाते अत्यंत घट्ट बनले असे त्यांच्या परिवारांकडुन सांगण्यात येते.

प्रतिक्रिया : 

महाराष्ट्राचा पहाडी आवाज असणारे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या शिवरायांच्या पोवाड्यांचा माझ्या मनावर प्रभाव पडल्यामुळे मला गडकिल्ल्यांचे पाहण्याची व पार करण्याची आवड निर्माण झाली. विविध ऐतिहासिक पुस्तकांतील विविध गडकिल्ल्यांचे फोटो माझ्या मनाला भुरळ घालीत होते. तेव्हा वडीलांचे याबद्दल मार्गदर्शन घेऊन विविध गडकिल्ले पार करण्यासाठी सुरू केली.व सर्वाच्या आशिर्वादाने मी खडतर असणारे गडकिल्ल्यांचे भ्रमण केले आहे. मला यामुळे नवीन असंख्य मित्र भेटले. गड पाहाण्यांचा आनंद प्राप्त झाला. महाराष्ट्रातील व महाराष्ट्रांबाहेरील अतिशय खडतर व अवघड असणारे गडकिल्ले पार करायचा आपला मानस आहे. असेही अंशने आपल्या बोंबड्या भाषेत प्रतिक्रिया देताना सांगितले.

-कु.अंश अभिमन्यु देशमुखल, लखमापुर ता.दिंडोरी.