आनंद इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे कुरुळी गावात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...!

आनंद इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे कुरुळी गावात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...!

News15 मराठी प्रतिनिधी सुनिल बटवाल

चाकण(चिबंळी-कुरुळी): खेड तालुक्यातील येथील आनंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना जागतिक वृक्षारोपण दिनानिमित्त 'वृक्ष हेच जीवन' ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे.

यासाठी कुरुळी गावांमध्ये गायरान येथे वड, पिंपळ कडूलिंब, आंबा, चिंच अशा ५० विविध फळझाडांचे वृक्षारोपण विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे संस्थापक डॉ.अनिल काळे, शाळेचे अध्यक्ष डॉ.गजानन मंकीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सरला रेवगडे, सरपंच अनिता बधाले, ग्रामसेवक कविता कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य  नितीन कड, शिल्पा सोनवणे, शाळेचे समन्वयक अनिल करपे  शिक्षकवृंद यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.