वाचाल तर भविष्यात वाचाल - शरद शेजवळ

वाचाल तर भविष्यात वाचाल - शरद शेजवळ

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

येणार काळ हा संगणक युगाचा असून जेवढी जास्त पुस्तके वाचाल तेवढी तुमची बुद्धिमत्ता वाढून भविष्यात स्वतःचे जीवन वाचू शकाल असे प्रतिपादन दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले.

जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन व  जागतिक हात धुणे दिन कार्यक्रम प्राचार्य शरद शेजवळ बोलत होते.

पुढे ते म्हणाले डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम एक मिसाईल मॅन रामेश्वरम सारख्या छोट्या गावात जन्माला येऊन जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत उच्च शिक्षणापर्यंत पोहोचले त्यांनी लहानपणी जी स्वप्न पाहिली ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नां चे सातत्य ठेवले म्हणूनच ते एक महान वैज्ञानिक झाले  तसेच जागतिक हात धुणे दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आरोग्याचा मूलमंत्र याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले प्रत्येक घटकात आपला हाताशी संबंध आहे हातातून तोंडामध्ये हजारो रोगजंतू प्रवेशित होतात व अनेक आजारांना आपणच आमंत्रित करतो म्हणून हात धुण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत हाताची बोटे तळहात पाठीमागचा भाग  या बाजूने सगळी स्वच्छता केली पाहिजे. 

यावेळी प्राचार्य शरद शेजवळ उपप्राचार्य उत्तम भरसठ  पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.ग्रंथालय प्रमुख  मोगल यांनी  इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यासाठी देऊन विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून पुस्तके वाचण्याचा आनंद घेतला. तसेच दिंडोरी नगरपंचायत तर्फे मतदार जनजागृती शपथ उपक्रमही घेण्यात आला.पुरुषोत्तम जाधव व  सागर भदाणे यांनी मतदान जनजागृतीची महिती दिली. 

सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा या नावाची थीम तयार करून आगळा वेगळा उपक्रम राबवला     

यावेळी उपप्राचार्य उत्तम भरसठ यांनी मार्गदर्शन केले.सारीका दाते,साधना पेलमहाले,अर्चना देवरे यांनी वाचन प्रेरणा दिनाची माहिती व हात धुवा दिनाचे प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली.सकाळ सत्रात सूत्रसंचालन नेहा देशमुख यांनी तर आभार संतोष कथार यांनी मानले.

दुपार सत्रात  एम.ए.पाटील व पी. एस. सोनवणे यांनी स्वच्छता बाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगून प्रात्यक्षिक करून दाखविले.आभार सुमन वीरकर यांनी मानले.