सह्याद्री करिअर अकॅडमीचा पोलीस भरती परीक्षेत दैदिप्यमान निकाल...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
आळेफाटा : सह्याद्री करिअर अकॅडमीची स्थापना २०१३ साली झाली. आजपर्यंत अकॅडमीच्या प्रवासात महाराष्ट्र पोलीस, वनरक्षक, तलाठी, आर्मी भरती आदी. विविध क्षेत्रात सह्याद्री अकॅडमीचे एकूण २००० पेक्षा जास्त विद्यार्थी देश सेवेत दाखल झाले आहेत.
सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यातहि प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना रोजगाराची हमी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत असे सह्याद्री अकॅडमीच्या व्यवस्थापकांच्या कडून सांगण्यात आले. २०२१ च्या पोलीस भरतीत आतापर्यंत SRPF पोलीस भरती वगळता एकूण १६३ विध्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. सह्याद्री अकॅडमीकडून गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सोय करून दिले जाते.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातून सर्वाधिक गुणवंत विद्यार्थी हे सह्याद्री करिअर अकॅडमीतून दरवर्षी यशस्वी होत असतात. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी तसेच शंका जाणून घेऊन शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतात. या अकॅडमीमध्ये प्रत्येक विषयाला अनुभवी व तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य असे अनमोल मार्गदर्शन व मदत सह्याद्री करिअर अकॅडमीच्या माध्यमातून केली जात आहे.
सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून असेच भविष्यातील तरुण पिढीचे उज्ज्वल भवितव्य घडवायचे असेल तर आजच आपण सह्याद्री करिअर अकॅडमी परिवारात सामील व्हावे अन भविष्यातील उज्ज्वल संधीचे सोने करावे असे अकॅडमीतुन गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांनचे तरुणाईला आव्हाण आहे.
या अकॅडमीची सर्व धुरा डुंबरे सर, गायकर सर, घोडेकर सर यशस्वीपणे सांभाळत आहेत. सह्याद्री अकॅडमीचा या वर्षीच्या यशस्वी निकालाबद्दल त्यांचे सर्व परिसरात कौतुक होत आहे.