रविवारी शिक्षकरत्न पुरस्कार वितरण; दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा उपक्रम...

रविवारी शिक्षकरत्न पुरस्कार वितरण; दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा उपक्रम...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने; दरवर्षी देण्यात येणारे दिंडोरी तालुका शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि. १० सप्टेंबर रोजी वलखेड फाटा येथील दत्तकृपा मंगल कार्यालयात या शिक्षकरत्नांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन वडजे, सरचिटणीस योगेश बच्छाव यांनी दिली आहे.

कार्यक्रमासाठी कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे अध्यक्षस्थानी राहणार असून, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी नम्रता, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव सोनवणे, सरचिटणीस निवृत्ती नाठे यासह जिल्हा व राज्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विशेष सन्मान... 

महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेते विलास जमदाडे, जिल्हा परिषद नाशिक आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते एम. नौशाद अब्बास,

जिल्हा संघ पुरस्कार्थी - सुनील माळी खेडगाव, वर्षा निकुंभ कोशिंबे

दिंडोरी शिक्षकरत्न पुरस्कार पुढील प्रमाणे - संदीप झुरडे जि.प. शाळा वाघाड, शांताराम आजगे जि.प. शाळा उमराळे बु, सुवर्णा खडताळे शाळा - बाडगीचा पाडा, सोमनाथ उचाळे शाळा - भनवड, चेतन घरटे जि. प.शाळा अक्राळे, अनिल गाडे जि. प. शाळा वणी मुले, अशोक अहिरे जि. प.शाळा जोपुळ, योगिता मोरे जि.प.शाळा म्हेळूस्के आदी गुणवंत शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

कार्यक्रमास दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्राथमिक शिक्षक संघांच्या  पदाधिकाऱ्यांनी केले आहे.