नाशिक जि.प.अध्यक्ष चषक बीटस्तरीय स्पर्धेत तपनपाडा शाळेचा प्रथम क्रमांक..!

नाशिक जि.प.अध्यक्ष चषक बीटस्तरीय स्पर्धेत तपनपाडा शाळेचा प्रथम क्रमांक..!

News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण 

दिंडोरी : दरवर्षाप्रमाणे याहीवर्षी जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये केंद्रस्तर बीटस्तर तालुकास्तर जिल्हास्तर या चार स्तरावर स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना संधी दिली जाते. चांदवड तालुक्यातील अतिदूर्गम भागातील द्विशिक्षकी शाळा तपनपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन या मुलांना स्पर्धेत सहभाग मिळावा म्हणून कोणत्यातरी स्पर्धा प्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत भामरे आणि उपशिक्षिका सौ.सुजाता भामरे यांनी स्पर्धेची तयारी सुरू केली. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्या होऊ नयेत. यासाठी शेतकरी समुहनृत्यातुन समाजाला बोध घेता यावा हा छोटासा प्रयत्न या नृत्यातुन विद्यार्थ्यांनी सादर केला.

सदर नृत्याचा केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक आला व बीटस्तरावर प्रवेश मिळाला. नुकत्याच जि.प.शाळा बहादुरी येथे वडनेर बीटाच्या स्पर्धा पार पडल्या. तेथेही या समुहनृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर चांदवड येथे होणाऱ्या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी या लहान गटातील समुहनृत्याची निवड करण्यात आली. तपनपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर नृत्य सादर करण्याची संधी मिळाल्याने शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, दूधखेड, ग्रामस्थांनी पालकांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना संधी देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत बदल होताना दिसत असल्यामुळे पालकांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संदिपकुमार शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत खैरनार, केंद्रप्रमुख मुजीब शेख, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बापू चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपञ व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केला.