व्ही. एन. नाईक महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न...
![व्ही. एन. नाईक महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64eb03b93df5b.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात; जेष्ठ उद्योजक तथा एम्पायर स्पायसेस अँड फूड लि. (राम बंधू मसाले) चे चेअरमन हेमंत राठी यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अँड.पी.आर.गिते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहचिटणीस अँड. तानाजी जायभावे उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना हेमंत राठी म्हणाले की, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना व्यापार व्यवसायात चांगल्या स्वरूपाच्या संधी आहेत. प्राप्त परिस्थिती विचारात घेता नोकऱ्यांची संख्या खूप कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यापार, उद्योग -व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता तयार करावी. विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुण शोधून त्यांचा विकास करावा, जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करावी, मोठे ध्येय ठेवावे, मोठी स्वप्न पहावी, सतत शिकण्याची वृती ठेवावी, जीवनात नितीमूल्यांचे महत्त्व फार मोठे आहे असेही राठी म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली. अँड.पी.आर गिते, अँड. तानाजी जायभावे, प्राचार्य डॉ.संजय सानप यांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक करून, विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. धीरज झालटे यांनी प्रास्ताविकातून वाणिज्य मंडळाची भूमिका मांडली. कार्यक्रमाप्रसंगी एप्रिल २०२३ च्या विद्यापीठ परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमलता दराडे व प्रा. महेश आव्हाड यांनी केले. तर आभार प्रा. वैशाली वाघ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली; डॉ. रुपाली सानप, प्रा.रोहिनी भालेराव, प्रा.रेश्मा कुटे, प्रा.महेश आव्हाड, प्रा.वैशाली वाघ, निलेश आहेर, ऋतिक बसते, पूनम बोडके, सुयश मराठे, दिव्या गोडदे, नयना चव्हाण, मयुरी भागवत, ऋषिकेश कोठूळे, जयेश चित्ते, रोशन सावंत, सुहानी गवते, श्रद्धा शेलार, अक्षदा बोडके, दुर्गेश गडकरी, किरण जाधव, अभिजित शिंदे, पायल शिंदे यांच्यासह राजेंद्र तीवडे, निलेश महाजन, योगेश गिते आदींनी परिश्रम घेतले.