माजी आमदार धनराज महालेंचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन..!
![माजी आमदार धनराज महालेंचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन..!](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_6595b54bc7e03.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण
नाशिक : दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार धनराज महाले यांच्या वाढदिवसानिमित्त अवनखेड येथे अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दि. ४ रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती माजी आमदार धनराज महाले मित्र मंडळाच्यावतीने दिली आहे.
माजी आमदार धनराज महाले यांना माणणारा मोठा वर्ग आहे. वाढदिवसानिमित्त येणार्या विधानसभेचे रणशिंग या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने फुंकले जाणार आहे.त्यामुळे या वाढदिवस सोहळ्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या वाढदिवसाला सर्व पक्षांमध्ये असलेले त्यांचे हितसंबंध व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे,सुरेश डोखळे,नरेंद्र जाधव आदींनी केले आहे.