दिव्यांगाचा 5% टक्के निधी तात्काळ वितरित करा, प्रहार संघटनेची मागणी...

दिव्यांगाचा 5% टक्के निधी तात्काळ वितरित करा, प्रहार संघटनेची मागणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख

लातूर : दिव्यांगाचा 5% टक्के निधी तात्काळ वितरित करावा अशी मागणी, प्रहार जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले आणि अंबादास शेळके यांनी प्रशासनाकडे केली आहे.

दि. ४ जानेवारी २०२४ रोजी प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्यावतीने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना; रामेगावच्या नोंदणी करत दिव्यांगाना त्यांचा हक्काचा ५% टक्के निधी तात्काळ देण्यात यावा व संपूर्ण तालुक्यातील गावा गावांमध्ये दिव्यांग निधी वितरित करण्यासंदर्भात संबंधित गटविकास अधिकारी यांना आदेशित करण्यात यावे असे निवेदन.! लातूर प्रहारच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना देण्यात आले.

दिव्यांग निधी वितरित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले यांनी दिला आहे. यावेळी अंबादास शेळके, धनु मामा पाचंगे, सुरज ईटकर आदी प्रहारसेवक उपस्थित होते.