छोटे मियाँ'च्या रोड शोला अल्पप्रतिसाद.! कळमनुरी करांनी फिरवली पाठ...

छोटे मियाँ'च्या रोड शोला अल्पप्रतिसाद.! कळमनुरी करांनी फिरवली पाठ...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ; छोटे मियाँ अर्थात सिने अभिनेता गोविंदा यांच्या रोड शो ला कळमनुरी येथील जुने बसस्थानक पासून सायंकाळी सुरुवात झाली. हा रोडशो भाजीमंडी, जुनेपोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस मार्गाने नविन बसस्थानक हिंगोली - नांदेड रस्त्याने काढण्यात आला.

यावेळी संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, आमदार संतोष बांगर, शिवसेनेच्या नेत्या शितल म्हत्रे, हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर अदि नेते मंडळीची उपस्थिती होती. नविन बसस्थानक समोर सर्वनेत्याची भाषणे झाली.

या रोडशोला सिने अभिनेते गोविंदा येणार असल्याने, या रोडशोला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु, तसे झाले नाही. जेवढे कार्यकर्ते आमदार संतोष बांगर बरोबर असतात; तेवढेच कार्यकर्ते या रोडशो ला दिसुन आले.