बंजारा समाजातर्फे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचा निषेध.!

बंजारा समाजातर्फे  शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचा निषेध.!

NEWS15 काशिनाथ चव्हाण

जळगाव : शिंदे गटातील पाचोर्‍याचे आमदार किशोर (आप्पा) पाटील यांच्या बॅनर वरून, बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे छायाचित्र गायब असल्याने.! या घटनेचा बंजारा समाजातर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की.! जामनेर तालुक्यातील गोदरी येथे बंजारा समाजाचा महा कुंभ आयोजित करण्यात आला आहे. या कुंभास शुभेच्छा देण्यासाठी पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बॅनर लावले. मात्र या बॅनरवर; छञपती शिवाजी महाराज, आनंद दिघे,  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे छायाचित्र लावण्यात आले असून, महत्वाचा आणि बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात आले नसल्याने, निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

हा कुंभ बंजारा समाजासाठी असताना; बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि समाजाच्या नेत्यांना.! आमदार किशोर पाटील यांच्याकडून हेतूस्पर डावलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमदारांच्या या बॅनर मुळं बंजारा समाजातर्फे निषेध करण्यात येत असून, त्यांनी याची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे.