आढळरावांनी सरड्या पेक्षा जलद रंग बदलला.! खा. अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर टीका...

आढळरावांनी सरड्या पेक्षा जलद रंग बदलला.! खा. अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर टीका...

NEWS15 मराठी - चाकण

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात; दोन्ही राष्ट्रवादी उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे सत्र काही थांबण्याचे नाव घेयना झाले आहे. कधी आढळराव पाटील अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधतात तर कधी कोल्हे पाटलांवर प्रहार करतात. परंतु, आता आढळरावांनी एक पाऊल मागे टाकत ह्याला कुठे तरी थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. 

नेमकं काय घडले...

सुरुवातीला आढळरावांनी कोल्हेना आव्हान दिलं, मग कोल्हेंनी आढळरावांना प्रतिआव्हान दिलं. पुरावे द्या अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडा, यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू आहे. यात आढळरावांचे आव्हान कोल्हेंनी स्वीकारले पण कोल्हेचे प्रतिआव्हान स्वीकारण्यापूर्वी आढळरावांनी मी यापुढं प्रतिउत्तर देणार नाही. कोल्हे मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवण्याचा डाव करतायेत, असा आरोप आढळरावांनी केला.  तर आढळरावांची ही भूमिका म्हणजे सरड्या पेक्षा जलद रंग बदलणारी आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली. तर कोल्हे यांच्या ह्या टिकेले आढळराव आणि पदाधिकारी कशे प्रतिउत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

शिरूर लोकसभेतून शिवाजी आढळराव आता माघार घेणार का? असा प्रश्न अमोल कोल्हेनी विचारला आहे.

आढळरावांनी पुरावे सादर करण्याचं दिलेलं आव्हान कोल्हेनी पूर्ण केलंय. लोकसभेत 7 एप्रिल 2017 आणि 13 फेब्रुवारी 2019 रोजी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे कोल्हेनी दाखवली आहेत. आढळरावांनी त्यांच्या कंपनीचं हित जोपासण्यासाठी लोकसभेत हा खटाटोप का केला? याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं. शिवाय मी पुरावे दिल्यावर लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडणार, हा दिलेला शब्द आता आढळरावांनी पूर्ण करावा, असं प्रतिआव्हान कोल्हेनी दिलंय. मुळात हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत 17 मार्च 2017, 9 डिसेंबर 2016 आणि 26 डिसेंबर 2018 या तारखांना कंपनी हितासाठी मांडलेल्या प्रश्नांची आठवण करून दिली. सोबत कागदपत्रांचा गठ्ठा दाखवत हे सगळे पुरावे टप्याटप्याने जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा देत, कोल्हेनी आढळरावांचं टेन्शन वाढवलं आहे.

आता आढळराव हे प्रतिआव्हान स्वीकारणार का? आणि हे पुरावे खोडून कोल्हेंना निवडणुकीतून बाहेर पडण्याचं नवं आव्हान देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

video link - 
https://x.com/kolhe_amol/status/1786973767597715822