डोंगरशेळकी तांड्यासह विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारूवर छापे.! ३ लाखापेक्षा अधिक मुद्देमाल नष्ट...
![डोंगरशेळकी तांड्यासह विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारूवर छापे.! ३ लाखापेक्षा अधिक मुद्देमाल नष्ट...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_663757d1ee340.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीर, वाढवणा पोलिस, उदगीर ग्रामीण पोलीस व एफएसटी पथकाने संयुक्त कारवाई करत; अवैध हातभट्टी दारूवर छापे मारून दारू नष्ट करण्यात अली.
३० एप्रिल ते ५ मे रोजी पर्यंत लातूर येथील वसंतनगर तांडा व डोंगरशेळकी तांडा या ठिकाणी विशेष मोहीम राबवून ३ लाख ७ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की ३० एप्रिल रोजी वसंत नगर तांडा येथे अवैध हातभट्टी दारूवर छापा टाकला तर ३ मे रोज शुक्रवारी सकाळी ११ वाजता उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथे अवैध हहातभट्टी दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीर, वाढवणा पोलिस,उदगीर ग्रामीण पोलीस, व एफ एसटी पथकाने छापा टाकून एकूण ४६७ लिटर हातभट्टी गावठी दारू,व हातभट्टी तयार करण्याचे गूळमिश्रित ५०४५ लिटर रसायन ८० लिटर देशी दारू,१७ लिटर विदेशी दारू असा एकूण ३ लाख ७ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १९ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत तर १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे,डोंगरशेळकी तांड्यावर १० दिवसापूर्वी २२ एप्रिल रोजी १ लाख ८ हजार ८१० रुपयांची दारू नष्ट करण्यात अली होती,दहा दिवसांत पुन्हा दुसऱ्यांदा डोंगरशेळकी तांडा येथे ३ मे रोज शुक्रवारी सकाळी ११ वाजता कारवाई करण्यात आली आहे,सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीरचे निरीक्षक रमेश चाटे,दुय्यम निरीक्षक जे के शिंदे,ए एस घुगे,एन डी कचरे,जी के मुगंडे, एम जे पाटील,आर जी सलगर,सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान एस व्ही केंद्रे,जे आर पवार,श्रीकांत साळुंखे, सुरेश काळे, वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, एपीआय गायकवाड, महिला पोलीस कर्मचारी नागरगोजे आर आर,आर डी सपकाळ, उदगीर ग्रामीणचे पोलीस नाईक नाना शिंदे,अविनाश फुलारी व एफएसटी पथकाचे कर्मचारी मारमवार,दंडे व्हि आर यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.