राजकीय : एक पतसंस्था कलेक्शन करणारा व्यक्ती ते सहकारी सोसायटी चेअरमन पदावर बिनविरोध निवड झालेले विठ्ठल बिरदवडे...

राजकीय : एक पतसंस्था कलेक्शन करणारा व्यक्ती ते सहकारी सोसायटी चेअरमन पदावर बिनविरोध निवड झालेले विठ्ठल बिरदवडे...

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खरबवाडी गावातील भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी जेष्ठ संचालक विठ्ठल दत्तात्रय बिरदवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिरदवडे यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सावता परिषदेचे पुणे जिह्याचे उपाध्यक्ष विठ्ठल बिरदवडे यांचा चेअरमन पदापर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता.. विठ्ठल बिरदवडे हे अजूनही गावातील एका पतसंस्थेसाठी कलेक्शनचे काम करत आहेत. त्याच माध्यमातून त्यांनी आपला गावातील नागरिकांशी थेट जनसंपर्क वाढवून या अगोदरही गाव पातळीवरील निवडूका लढवल्या होत्या. पण त्यांना त्यात यश मिळाले नाही. पण त्यांनी हार न मानता अतिशय हजरजबाबी पद्धतीने कुणाला न दुखावता पुन्हा त्याच जोशात जनतेत मिसळून गावातील सोसायटीच्या निवडणूकीला सामोरे जाऊन त्यांनी मोठा विजय मिळविला. त्यानंतर ठरल्या प्रमाणे क्रमांवार पद्धतीने एका एका संचालकांना चेअरमन पदाची संधी देण्याचे ठरले होते. त्यानुसार यावेळी विठ्ठल बिरदवडे यांची चेअरमन पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिरदवडे हे जेष्ठ संचालक आणि त्यांचा सामाजिक संपर्क बघता ते या पदाला साजेसे असे काम करतील असा विश्वास इतर त्यांचे सहकारी संचालक बोलून दाखवत आहेत. विठ्ठल बिरदवडे यांचे खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विठ्ठल बिरदवडे यांना News15 मराठी वाहिनीकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!