कळमनुरी तालुक्यातील धनगर समाजाचा; ST आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार...
![कळमनुरी तालुक्यातील धनगर समाजाचा; ST आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_6502916704880.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाची महत्त्वाची बैठक दि.१२ सप्टेंबर रोजी हिंगोलीतील कळमनुरी येथील शासकीय विश्रामगृहात; समाजाचे ज्येष्ठ नेते ॲड. के. के. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत सर्वांनुमते ठरविण्यात आले की, महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची सरकारने अंमलबजावणी करावी, चौंडी ता. जामखेड जि. अहमदनगर येथील उपोषणकर्त्यांना पाठींबा द्यायचा, सोलापूर येथील शेखर बंगाळे यांना मारहाण करणाऱ्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अंगरक्षका विरूद्ध कार्यवाही करावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळला १००० हजार कोटी निधी द्यावा, महामंडळाचे उपविभागीय कार्यालय कळमनुरी येथे चालू करावे, आदिवासी विभागाच्या ७४ योजना धनगर समाजाला लागू कराव्यात, कळमनुरी पंचायत समिती इमारतीच्या परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात.
वरील मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास धनगर समाज कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मोर्चा, रास्तारोको, जेलभरो, निदर्शने, घेराव असे तीव्र आंदोलन करून सरकार विरूद्ध रस्त्यावर उतरणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.