राजकीय : स्मार्ट व्हिलेज आंबेठाण, बोरदरा, वराळे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संतोष मांडेकर पाटील यांची बिनविरोध निवड..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : औद्योगिक परिसरातील आर्थिक दृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्यां स्मार्ट व्हिलेज आंबेठाण, बोरदरा, वराळे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संतोष बाबासाहेब मांडेकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संतोष मांडेकर पाटील यांना त्याच्या वडिलांच्या पासून राजकीय व सामाजिक वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील बाबासाहेब मांडेकर पाटील यांचेही सामाजिक जीवनात व पोलीस पाटील म्हणून महाराष्ट्रभर नाव होते. त्यांचा वारसा आता त्यांच्या सुनबाई तृप्ती संतोष मांडेकर पाटील पुढे चालवत आहेत. त्यांनीही त्यांच्या पोलीस पाटील पदाच्या कारकिर्दीत दैदिप्यमान कामगिरी करून दाखवली आहे. त्यांना त्यांच्या याच उत्कृष्ट कामाबद्दल अनेक सामाजिक पुरस्कारानी नावाजलेले आहे. संतोष मांडेकर पाटील यांचा स्वभाव मितभाषी असल्याने त्यांचा गावात आणि आजबाजूच्या गावांतहि मोठा गोतावळा आहे.
संतोष मांडेकर पाटील यांची सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे पंचक्रोशी व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या भावी वाटचालीस News15 मराठी वाहिनीकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!