मंत्री गिरीश महाजन यांची ऑडियो AUDIO क्लिप व्हायरल.! आणि धनगर समाज आक्रमक...

मंत्री गिरीश महाजन यांची ऑडियो AUDIO क्लिप व्हायरल.! आणि धनगर समाज आक्रमक...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

लातूरात मागील काही दिवसांपासून धनगर आरक्षणाच्या मागणीला घेऊन, अनेक समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाबाबत भाजप नेते रमेश कराड आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये फोनवर काही चर्चा झाली असून, ह्या चर्चेची सध्या एक AUDIO क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. तर या संभाषणावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष महाजन यांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली. त्यात भाजपा नेते रमेश अप्पा कराड यांनी मंत्री गिरिष महाजन यांना.! लातूर येथे सकल धनगर समाजाचे उपोषण सुरु असल्याचे सांगितले आणि भेट देण्याची विनंती केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी माझी बैठक आहे असे सांगितले. यासह अन्य चर्चा झाली. त्यावरून आता धनगर समाज मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाराज झाला असून, लातूरात त्यांना फिरू न देण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.

भाजप नेते रमेश कराड आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषण थोडक्यात.. 

मंत्री गिरिष महाजन - त्यांना काय पत्र पाहिजे ते पत्र दिलंय 

रमेश कराड - पत्रावर नाही भागणार भाऊ , त्यांचं पुन्हा कसं झालंय 

मंत्री गिरिष महाजन - पद्धत झालीय, कोणीतरी एक मंत्र्यांनी यावं, सोडा हो, सोडा हो 

रमेश कराड - धनगर समाजाचं थोडंसं, धनगर समाज आपल्यासोबत आहे भाऊ पाहिल्यापासून 

मंत्री गिरिष महाजन - परवा बैठक झाली cm बरोबर , dcm बरोबर , 5, 6 दिवसापूर्वी तरीपण त्यांचं समाधान होत नाही.... करायचं काय आपण 

रमेश कराड - आपण जर थोडंसं नाही गेलं 

मंत्री गिरिष महाजन - 

रमेश कराड - आपण पालकमंत्री आहात , पालक आहात ना आमचे 

मंत्री गिरिष महाजन - खरं आहे 

रमेश कराड - नेतेच आहात तुम्ही महाराष्ट्राचे 

मंत्री गिरिष महाजन - तिथल्या मंत्र्याला सांगतो 

मला इथे बैठक आहे ,उद्या अधिवेशन आहे , मला अधिवेशन सोडून येणं शक्य होणार नाही ....

आता इथे अधिवेशन चालू आहे , आपल्याला कल्पना आहे 

रमेश कराड - हो ना...

Viral Audio Clip

https://youtu.be/i1xsDPhP5g4