हिंगोली लोकसभेसाठी कैलास राठोड इच्छूक.! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना लिहलं पत्र...

हिंगोली लोकसभेसाठी कैलास राठोड इच्छूक.! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना लिहलं पत्र...

 NEWS15 मराठी प्रतिनिधी - बालाजी घडबळे

नांदेड : नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत; भारतीय जनता पार्टीत सामील झाल्याने, नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. त्यातच महाराष्ट्रात ओबीसी मराठा संघर्ष चालू असल्याने ओबीसींच्या मताधिक्याचा विचार करुन, हिंगोली लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी नांदेड येथील राठोड कोचिंग क्लासेसचे संचालक कैलास राठोड यांनी; काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून इच्छा व्यक्त केली आहे.

कैलास राठोड यांचे नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. या अगोदर ते 2012 मध्ये स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठात सिनेटवर निवडुन सुद्धा आले होते. राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार सुद्धा झालेला आहे. मागील बऱ्याच वर्षात क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी लाखो डाॕक्टर / इंजिनियर बनवन्याचे काम केले आहे. नांदेड जिल्ह्यात बंजारा व इतर ओबीसींची मतांची संख्याबळ मोठे असल्याने यावेळेस ओबीसीचाच खासदार होणार अशी हिंगोली लोकसभा मतदार संघात चर्चा चालु आहे.

तर हिंगोली लोकसभेसाठी काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.