कादवा कारखाना येथे सुरक्षा सप्ताह साजरा...

कादवा कारखाना येथे सुरक्षा सप्ताह साजरा...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

कादवा सहकारी साखर कारखाना येथे सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी सुरक्षा सप्ताह निमित्त कामगारांनी सुरक्षेची शपथ घेतली.

यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी मार्गदर्शन करताना कामगारांनी आपले कामकाज करताना सावधानता बाळगत काळजी घ्यावी; कुणीही मोबाईलचा वापर करू नये; सुरक्षा साधनांचा वापर करावा आदी सूचना केल्या.

यावेळी सचिव राहुल उगले, लेखापाल सत्यजित गटकळ, चीफ केमिस्ट अर्जुन सोनवणे, शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ, युनियन अध्यक्ष भगवान जाधव, माजी अध्यक्ष सुनील कावळे, सरचिटणीस अजय दवंगे, संतोष मातेरे आदी युनियन पदाधिकारी, कामगार कल्याण अधिकारी गणेश आवारी, सुरक्षा अधिकारी गणेश मार्कनड, योगेश जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप तिडके, स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके, ई.डी.पी.मॅनेजर किरण शहाणे, खरेदी अधिकारी अरुण सुर्यवंशी, डीस्टीलरी मॅनेजर सावंत पर्यावरण अधिकारी बापू शिंदे आदींसह सर्व अधिकारी कामगार उपस्थित होते.