वलखेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष मित्तल यांची भेट...
![वलखेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष मित्तल यांची भेट...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_653a572079bc5.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष मित्तल यांनी व अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आशिमा मित्तल यांच्या समवेत दिंडोरीच्या गट विकास अधिकारी नम्रता जगताप, सह गटविकास अधिकारी हजारी यांनी भेट देऊन; प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्राधान्यक्रम यादीतील भूमिहीन लाभार्थी यांना जागा उपलब्ध करून सामुहिक घरकुल वसाहत बांधकाम बाबत पाहणी केली. तसेच बचतगटाच्या तेल गाळप व्यवसायास भेट देऊन माहिती घेतली व भुईमुगा पासून तयार होणाऱ्या पदार्थ तयार करणेबाबत व सदर व्यवसाय समृद्धीस कसा येईल याबत मार्गदर्शन केले. तसेच माझी वसुंधरा अभियान,आयुष्यमान भारत योजना अंतर्गत गोल्डन कार्ड वितरण, जल जीवन मिशन अंतर्गत कामे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कामे, १५ वा वित्त आयोग निधी नियोजन, मॉडेल व्हिलेज अवॉर्ड मार्गदर्शन तसेच १ ते ३३ नमुने अद्ययावत बाबत आढावा घेतला.
यावेळी सरपंच विनायक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य हिरामण पाटील, सौ. सुनीता राऊत, मंगला राजगुरु, विस्तार अधिकारी ठाकरे आढाव, उपअभियंता घारे पाटील, मनीष जाधव, ग्रामसेवक दिगंबर चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.