नवीन गणवेशाविनाच विद्यार्थ्यांचा स्वतंत्र दिन साजरा.! अपेक्षाभंग
![नवीन गणवेशाविनाच विद्यार्थ्यांचा स्वतंत्र दिन साजरा.! अपेक्षाभंग](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66bde94c41cc0.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
आज सर्वत्र ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला मात्र एका बाजूला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी तरी मोफत गणवेशचा प्रश्न मार्गी लागेल असे वाटत होते. परंतु ही अपेक्षा फोल ठरवून विद्यार्थ्यांच्या पदरी मात्र निराशाच दिसली.
त्याचे कारणही तसेच आहे.
राज्य सरकारने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी "एक राज्य एक गणवेश"योजना नवीन शैक्षणिक सत्रापासून सुरू केली असून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना एक नियमित व एक स्काऊट गाईड असे दोन गणवेश देण्याची घोषणा केली मात्र अजूनही हा गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने पालक वर्गांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळेल अशी आशा विद्यार्थ्यांना होती मात्र आज मीतिस दोन महिने उलटूनही स्वातंत्र्य दिनाच्या आधी गणवेश मिळेल असे वाटत होते मात्र आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही विद्यार्थ्यांच्या पायात नवे बूट तर अंगात जुनाच गणवेश असे चित्र पाहावयास मिळाले.आता तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल का? राज्यकर्त्यांना व संबंधित विभागाला जाग येईल का असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.